Welcome to Sai Jyotish

Home   /   About US

About Us

श्री दीपक रत्नाकर दीक्षित( गणू महाराज)

गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक कार्यात सहभाग रक्तदान, वनसंवर्धन, कोरोना काळात अनेकांना आर्थिक मदत गावातील अपंग, निराधार व विधवा कुटुंबाना तीन महिन्याचा किराणा वाटप केला तसेच कोविड काळात शासकीय रुग्णालयात व पोलिस कर्मचारी यांना मास्क, सनीटायझर पी.पी ई. कीट, कोरोना प्रतिबंधात्मक गोळ्या इत्यादी वाटप, गावातील सर्व रेशन कार्ड धारक कुटुंबाना एक किलो खाद्यतेलाचे पाऊच वाटप केले. गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मदत, दरवर्षी धार्मिक कार्यक्रमात महाप्रसाद वाटप अशा अनेक उपक्रमात सक्रिय सहभाग असतो

उपेक्षित, वंचित, श्रमिक, कष्टकरी, एसटी कर्मचारी, दलीत, आदिवासी, अंध-अंपग घटकांच्या दैनंदिन गरजांसाठी अहोरात्र सेवा, सुख दुखात मदत करत जगणारी व्यक्ती समाजासाठी प्रेरणादायी असते. भविष्याचा अचूक अंदाज देत सन्मार्ग दाखवत म्हसदी (ता. साक्री, जि.धुळे) येथील ग्राम पुरोहित दीपक रत्नाकर दिक्षित उर्फ गणू महाराज (कावठेकर) यांनी समाज सेवेचा जणू वसाच घेतला आहे. ब्राह्मण समाजात जन्म घेऊन अगदी कमी वयात महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकावर आपली छाप टिकून ठेवली आहे. भविष्य विशारद म्हणून परिचित असलेले गणू महाराज आज अनेकांचे श्रध्दास्थान आहेत. शिवाय अनेक युवकांना सन्मार्गाला लावले आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेले काम इतरांना प्रेरणा देणारे आहे.

दरवर्षी हनुमान जयंती, महाशिवरात्री, साई पारायणाच्या भंडारा (महाप्रसाद) वाटपापासून तर दिन दुबळ्या कुटुंबासाठी दिलेली लाख मोलाची मदत आदर्शवत आहे. भविष्यविशारद, भिक्षुकी पेशातील गणू महाराज गेल्या बारा वर्षांपासून समाज सेवेत समाविष्ट आहेत.' म्हसदी 'मामाचे गाव असूनही त्यांनी समाजाशी नाळ भक्कम जोडली आहे. कोरोना काळात चार महिने अनेकांची उपसमार होत होती. मानव जातीचे देणे लागतो म्हणून प्रत्येक कुटुंबास 1100 खाद्य तेलाचे पाऊच वाटप केले.तीनशे कुटुंबाना तीन महिन्याचा किराणा वाटप केला. पोलिस, आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्धांना मास्क व सॅनिटायझर दिले.

ग्रामदेवत श्रीधनदाई देवी साईबाबांवर अफाट श्रध्दा असणा-या महाराजांची प्रत्येक देवांवर नितांत श्रद्धा आहे. साईबाबा कॉलनीत साई पारायणात संगीतमय भागवत कथेसाठी सहकार्य केले. देऊर रस्त्यावरील विश्वेश्वर मंदिराजवळ भाविकांसाठी एक खोली बांधून दिली. दरवर्षी महाशिवरात्रीच्या यात्रेत एक क्विंटल साबुदाणा खिचडी व दुध महाप्रसाद म्हणून वाटप करतात. कोरोना 'काळात लॉकडाऊनमुळे निराधार कुटुंब, सफाई कामगार अडचणीत असताना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. किंबहूना प्रत्येकाच्या सुख -दुःखात महाराजांचा हमखास सहभाग असतो.

निराधार कुटुंबे, धनदाईदेवीचे सेवेकरी व स्वच्छता कर्मचा-यांना जीवन आवश्यक वस्तू वाटप केले. मुस्लिम कब्रस्तानात वृक्ष संवर्धनासाठी 15 हजार रुपये मदत दिलीद्रवर्षी साई पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, हनुमान जयंतीनिमित्त गावाला महाप्रसाद वाटप करतात. तसेच यंदा कोजागरी पौर्णिमा निमित्त गावात दोनशे लिटर दूध वाटप करण्यात आले.

गरिब आणि सामान्य कुटुंबासाठी गणू महाराज स्वतःहून धावून जातात. विशेष म्हणजे ते जात-पात मानत नाही. केवळ मानवता धर्म ते मानतात. एका आदिवासी महिलेचे झोपडी घर आगीत जळून खाक झाले होते. तेव्हा गणू महाराजांनी महिलेस मोठा दिलासा दिला. घरगुती साहित्यासह आवश्यक किराणा साहित्य भेट दिले. नुकतेच सबंधीत महिलेच्या मुलाचे साध्या पद्धतीने लग्न झाले. तेव्हा श्रीगणू महाराज यांनी किराणा साहित्य भेट देत विवाह सोहळ्यात सक्रिय झाले. गरिब कुटुंबास मदत करताना ईश्वरी समाधान मिळत असल्याचे ते सांगतात. नुकताच जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाप्रसाद वाटप करत त्यांनी आदिवासी बांधवाचा आनंद द्विगुणीत केला.

सामाजिक कामात नेहमी योगदान देणा-या ग्राम पुरोहित गणू महाराज यांचा विविध संस्था, सरपंच, आमदार, खासदारांनी सन्मान केला आहे. खासदार डॉ. हिनाताई गावित, (नंदुरबार लोकसभा) साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, (साक्री विधान सभा ) तळोदा - शहादा येथील आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेच्या सभापती मंगलाताई पाटील, शिवसेनेचे नेते हिलाल माळी, जिल्हा परिषदेचे सदस्य तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, आदिवासी आश्रम शाळेचे अध्यक्ष चंद्रकांत देवरे, तत्कालीन सरपंच कुंदन हिम्मतराव देवरे, नामपूर (ता. सटाणा) येथील श्री.हरी शैक्षणिक संस्था, म्हसदी ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेची म्हसदी येथील प्राथमिक शाळा, ग्रामविकास अधिकारी मेघश्याम बोरसे, वृक्ष प्रेमी चैत्राम पवार आदींनी समाज सेवक व कोरोना योद्धा म्हणून सन्मान चिन्ह देऊन गणू महाराज यांचा गौरव केला.

सन्मान : राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार, श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान कॉविड योध्दा पुरस्कार, आदर्श गुरुजन पुरस्कार, राष्ट्रीय प्रतिभा सन्मान सुवर्ण पदक समाज रत्न पुरस्कार, राष्ट्रीय मानवतावादी पुरस्कार, शिव जन्मोत्सव 2022, खासदार व आमदारांचे सन्मान पत्र आदी.