येथील ग्राम पुरोहित श्री दीपक रत्नाकर दीक्षित उर्फ गणू महाराज यांना दि. 16.3. 2024 रोजी पुणे येथे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्री गणू महाराज यांना हा पुरस्कार उपस्थित असलेले मान्यवर सिने अभिनेता दीपक शिर्के, तृप्ती देसाई, मेघराज भोसले, सिने अभिनेत्री झेबा शेख, सिने अभिनेता राजा मुराद आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी गावातील रावसाहेब उमाकांत देशपांडे, रितेश दीक्षित, प्रकाश देवरे, अजिंक्य देवरे, हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते व त्यांनी महाराजांना खूप शुभेच्छा दिल्यात व अभिनंदन केले.
म्हैसदी येथील गणू महाराज हे गेल्या अठरा वर्षापासून समाजसेवेचे कार्य करीत आले आहेत. तसेच गणू महाराज हे ज्योतिष शास्त्राचे काम करीत असताना अनेक अडचणींना तोंड देऊन सामना करत आज त्यांनी स्वतःचे विश्व निर्माण केले आहे.
एक निस्वार्थी समाजसेवक म्हणून त्यांची पूर्ण महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली आहे. गणू महाराज ब्राह्मण समाजात जन्म घेऊन अगदी कमी वयात प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकांवर आपली छाप उमटवून ठेवली आहे. गणू महाराजांनी अनेक युवकांना सन्मार्गाला लावले आहे तसेच कोरोना काळात त्यांनी केलेले समाजकार्य हे इतरांना प्रेरणादायी ठरत आहे.
11:20
*86%

श्री गणू महाराज यांचे पूर्ण वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम हे चालू असतात रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर, वनसंवर्धन, गावातील विधवा निराधार महिलांना आर्थिक मदत करणे असे एक ना अनेक उपक्रम राबवित असलेल्या समाजसेवकाला आज पुणे येथे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल पूर्ण साक्री तालुक्यातील व परिसरातील महाराजांवर प्रेम करणारे प्रेमी मंडळी यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.